Jalgaon News
Jalgaon News

Illegal Sand Smuggling : जळगावच्या अमळनेरमध्ये अवैध वाळूची वाहतूक, महसूल अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांना मारहाण

Sand Mafia: अमळनेरमध्ये अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावर 10–15 जणांनी हल्ला केला.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

जळगावच्या अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे ग्राम महसूल अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांना मारहाण करत गावठी कट्टा लावत अवैध वाळूची वाहतूक करणारे जेसीबी आणि ट्रॅक्टर पळवून नेल्याची घटना समोर आली आहे.

Jalgaon News
Rail Roko Protest: छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावरून उर्दूतील नाव हटवल्याने SDPI आक्रमक; रेल रोको आंदोलनाची घोषणा, परिसरात कडेकोट बंदोबस्त

मंडळाधिकारी पुरुषोत्तम पाटील, ग्राममहसुल अधिकारी जितेंद्र पाटील अशी मारहाण झालेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांची नावे आहेत. ग्राम महसूल अधिकारी यांच्यासह कर्मचाऱ्यांच्या 6 जणांचे पथकाने अवैध वाळू करणारे ट्रॅक्टर व जेसीबी कारवाईसाठी अडवले होते.

Jalgaon News
PM Narendra Modi: वंदे मातरमच्या १५० वर्षानिमित्त पंतप्रधान मोदींचे विधान, काँग्रेसवर तीक्ष्ण टीका

वाळूची वाहतूक करणारे वाहन अमळनेर तहसील कार्यालयात नेण्यास सांगितला असता, दहा ते १५ जणांनी शिवीगाळ करत डोळ्यावर स्प्रे मारत ग्राममहसुल अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या डोळ्यावर स्प्रे मारत त्यांना काठीने मारहाण केली. यात एकाने मंडळाधिकारी पुरुषोत्तम पाटील यांच्या डोक्याला गावठी कट्टा लावला आणि जीवे मारण्याची धमकी देत ट्रॅक्टर आणि जेसीबी पळवून नेल्याचे पोलिसात दाखल तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी मंडळ अधिकारी पुरुषोत्तम पाटील यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलीस ठाण्यात दहा ते पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Summary
  • अवैध वाळू वाहतूक थांबवताना महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण.

  • डोळ्यात स्प्रे करून, काठीने मारहाण करत गावठी कट्टा लावून धमक्या.

  • आरोपींनी जेसीबी आणि ट्रॅक्टर जबरदस्तीने पळवून नेले.

  • 10–15 जणांविरुद्ध मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com