हवामान खात्याकडून नागरिकांना दिलासादायक बातमी! पावसाचा जोर ओसरणार

हवामान खात्याकडून नागरिकांना दिलासादायक बातमी! पावसाचा जोर ओसरणार

राज्यभरात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा स्थितीत हवामान विभागाने नागरिकांना दिलासादायक बातमी दिली आहे.

मुंबई : राज्यभरात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत हवामान विभागाने नागरिकांना दिलासादायक बातमी दिली आहे. उद्यापासून पावसाचा जोर ओसरणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

हवामान खात्याकडून नागरिकांना दिलासादायक बातमी! पावसाचा जोर ओसरणार
कोणाच्या बायकोविषयी लिहीलं की लगेच पकडतात, पण राष्ट्रपित्यांबाबत...; पटोलेंचा टोला

हवामान विभागाच्या माहितीनुसार, उद्यापासून राज्यात मान्सूनची तीव्रता कमी होणार आहे. दक्षिण ओरिसा भागात असलेल्या क्षेत्राची तीव्रता कमी झाली असून राज्यावरचा कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे स्थित आहे. यामुळे राज्यात पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे. १ ऑगस्टपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी पाऊस होणार आहे. तर, पुण्यात पुढचे काही दिवस ढगाळ हवामान राहील.

दरम्यान, मागील काही दिवासांपासून राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. तर, नदी, नाले दुथडी भरून वाहत आहे. तसेच, अनेक धरणे भरली आहेत तर काही भरण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे काही ठिकाणी दुर्घटना घडण्याचे प्रमाणही वाढले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com