महाराष्ट्र
”नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ मदत जाहीर करावी”
तोत्के चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका कोकणाला बसला आहे. या वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस रायगड जिल्ह्यात दाखल झाले होते. यावेळी नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर फडणवीस यांनी नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ मदत जाहीर करण्याची मागणी केली.
राज्य सरकारने चक्रीवादळ बाधितांना भरघोस मदत करावी, निसर्ग वादळाची मदत अजून मिळालेली नसल्याचीही आठवण करून दिली. रायगड जिल्ह्यात 5 हजार हेत्क्टरमधल्या फळ-पिकांसह, 8 ते 10 हजार घरे व २०० शाळांचं मोठे नुकसान झाले आहे. तसेच बोटींचं नुकसान झालं आहे. 70 हजार घरांमधली वीज गायब आहे, अद्याप वीज पूर्ववत झाली नाही आहे. या सगळ्यांचं तातडीने पंचनामा होऊन सरकारने तातडीने मदत करावी, असं आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं..