Congress Meeting
महाराष्ट्र
Congress Meeting : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये बैठकांचा जोर; हर्षवर्धन सपकाळांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक
मुंबई पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक
थोडक्यात
काँग्रेसची देखील आज महत्त्वाची बैठक
मुंबई पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक
हर्षवर्धन सपकाळांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक
(Congress Meeting ) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागल्याचे पाहायला मिळत आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये बैठकांचा जोर पाहायला मिळत असून काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काँग्रेसचे सर्व माजी मंत्री आणि कोर कमिटी सदस्य उपस्थिती राहणार आहेत.
आज दुपारी 3 वाजता टिळक भवनात ही बैठक पार पडणार असून यातच 'युती केली तर कार्यकर्त्यांना लढता येत नाही..' असे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर आजच्या बैठकीला विशेष महत्त्व आहे.
