चांद्रयान मोहिमेत महाराष्ट्राचा मोलाचा वाटा! सांगोलाच्या तरुणाचं मोठे योगदान

चांद्रयान मोहिमेत महाराष्ट्राचा मोलाचा वाटा! सांगोलाच्या तरुणाचं मोठे योगदान

भारताची चांद्रयान ३ ही मोहिम आता यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे. या मोहिमेमध्ये सांगोला तालुक्यातील एका उद्योजकाचे मोठे योगदान असल्याचे समोर आले आहे.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

अभिराज उबाळे | पंढरपूर : भारताची चांद्रयान ३ ही मोहिम आता यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे. या मोहिमेमध्ये सांगोला तालुक्यातील एका उद्योजकाचे मोठे योगदान असल्याचे समोर आले आहे. या उद्योजकाने सिल्वर आणि कॉपर पासून तयार केलेल्या ट्यूबचा वापर या चांद्रयानामध्ये करण्यात आला आहे. अत्यंत गरीब परिस्थितीमधून आलेल्या शेखर भोसले या उद्योजकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

चांद्रयान मोहिमेत महाराष्ट्राचा मोलाचा वाटा! सांगोलाच्या तरुणाचं मोठे योगदान
शिवसैनिक चुकीला माफी देतो, पापाला नाही; उध्दव ठाकरेंचा शिंदे गटावर निशाणा

शेखर भोसले यांचे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे चांदीपासून इलेक्ट्रीक उपकरणे बनवण्याचा व्यवसाय आहे. गेल्या 11 वर्षांपासून ते इस्त्रोला चांदी आणि कॉपर पासून बनवलेली विविध उपकरणे पुरवतात. चांद्रयान मोहिमेत देखील कॉपर आणि चांदीपासून बनवलेल्या 50 ट्युब तयार करून इस्त्रोला दिल्या आहेत. त्या सर्व ट्युबचा वापर चांद्रयानामध्ये करण्यात आला आहे. या ट्यूबमुळे चांद्रयानचे वजन कमी होण्यास मदत झाली आहे. शिवाय चांद्रयानला वेळोवेळी देण्यात आलेले सिग्नल देखील व्यवस्थित पोहोचण्यास मदत झाली आहे.

शेखर भोसले हे मूळचे सांगोला तालुक्यातील खवासपूर गावचे आहेत. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे खामगावला झाले आहे. बेंगलोर येथून त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केली. आजही त्यांची खवासपूर गावात शेती आहे. ही मोहिम यशस्वी होत असल्याने सांगोला तालुक्यात शेखर भोसले यांचे कौतुक केले जात आहे. सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनीही शेखर भोसले यांच्या या कामगिरीचे कौतुक केले. चांद्रयान रूपाने सांगोला चंद्रावर पोहचणार याचा अभिमान, अशी प्रतिक्रिया शहाजी बापू पाटील यांनी दिली आहे.

दरम्यान, भारताची चांद्रयान ३ ही मोहिम आता यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे. आज हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर संध्याकाळी 5 वाजून 44 मिनिटांनी चंद्रभूमीला स्पर्श करेल. आणि भारत इतिहास रचेल. याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. दक्षिण ध्रुवावर चांद्रयान ३ उतरणं हे भारताच्या दृष्टीनं दैदिप्यमान यश असेल, असं इस्रोचे माजी चेअरमन डॉ. के. सिवन यांनी म्हंटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com