Sinhagad Fort
Sinhagad Fort

Sinhagad Fort : पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' तारखेपर्यंत सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी राहणार बंद

सिंहगड किल्ल्यावर सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे किल्ला 2 जूनपर्यंत सर्वसामान्य नागरिक आणि पर्यटकांसाठी पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

(Sinhagad Fort ) सिंहगड किल्ल्यावर सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे किल्ला 2 जूनपर्यंत सर्वसामान्य नागरिक आणि पर्यटकांसाठी पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत पायवाट तसेच वाहन मार्गाने किल्ल्यावर जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

गडावर अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे झाल्यामुळे त्यांच्यावर कारवाई सुरू करण्यात आली आहे. ही कारवाई अजूनही सुरू असून, काही ठिकाणी स्थायिक सीमेंट-काँक्रीट संरचना हटवायच्या शिल्लक आहेत. या कामांसाठी यंत्रांचा वापर करता न आल्यामुळे सर्व प्रक्रिया हाताने केली जात आहे, त्यामुळे वेळ लागतो आहे. 31 मेपासून ते 2 जून या कालावधीत गिर्यारोहक, ट्रेकर, पर्यटक यांना सिंहगडावर प्रवेश नाकारण्यात येणार आहे.

संबंधित कामकाज पूर्ण होईपर्यंत गड बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, ही माहिती उपवनसंरक्षक मनोज बारबोले यांनी दिली आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com