महाराष्ट्र
गटारी निमित्त कोल्हापूरात मासे , मटण खरेदीसाठी झुंबड
सतेज औंधकर, कोल्हापूर
आषाढ महिना संपण्यास अवघा एक दिवस उरलाय. त्यानंतर श्रावण सुरू होणार असल्याने आज रविवारी गटारी अमावस्येचा मुहूर्त साधत कोल्हापूरच्या मटण मार्केटमध्ये चिकन, मटण, मासे, खेकडे मांसाहारी पदार्थ खरेदीसाठी नागरीकांनी मोठी गर्दी केलीय.
श्रावणात अनेक घरांमध्ये मांसाहारी पदार्थ केले जात नाहीत. त्यामुळे श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी बहुसंख्य कोल्हापूरकर मांसाहारी पदार्थांवर ताव मारतात. आषाढ महिना संपण्यास अवघा एक दिवस उरल्याने आणि त्यात रविवारी असल्यानं मटणासह इतर मांसाहारी पदार्थ खरेदीसाठी बाजारात गर्दी झाली आहे.