Nagpur: नागपुरात तरुणाने फेसबुक लाईव्ह करून संपवलं आयुष्य

Nagpur: नागपुरात तरुणाने फेसबुक लाईव्ह करून संपवलं आयुष्य

एका मुलीच्या त्रासाला कंटाळून एका तरुणाने फेसबुक लाईव्ह केल्यावर आत्महत्या केली.
Published by  :
Team Lokshahi

कल्पना नळसकर | नागपूर : एका मुलीच्या त्रासाला कंटाळून एका तरुणाने फेसबुक लाईव्ह केल्यावर आत्महत्या केली. संबंधित तरुणाने व्हिडीओ काढल्यानंतर कन्हान नदीच्या पुलावरून नदीत उडी घेत जीव दिला. कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. मनीष रामपाल यादव असे मृतकाचे नाव आहे. तो इलेक्ट्रिकचे दुकान चालवायचा. तो रविवारी सकाळी १० वाजता घरून दुचाकीने निघाला. सायंकाळी त्याने अगोदर मोबाईलवर व्हिडीओ तयार केले व त्यात त्याच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्याने फेसबुक लाईव्ह केले व मोबाईल दुचाकीच्या डिक्कीत ठेवला. त्यानंतर त्याने कन्हान नदीत उडी घेत जीव दिला. त्याच्या आत्महत्येची माहिती पोलिसांना मिळताच पथक घटनास्थळी पोहोचले. तेथे दुचाकी दिसली. दुचाकीची डिक्की उघडली असता त्यात मोबाईल दिसून आला. त्यातील व्हिडीओतून नेमका प्रकार समोर आला. त्याच्या संपर्कात असलेल्या एका मुलीने त्याला जाळ्यात ओढले व पैशांची मागणी केली. जर पाच लाख रुपये दिले नाही तर अत्याचाराची तक्रार करू अशी धमकी मुलीसह तिच्या आईवडिलांनी दिली. मृतक याने पैसे जमविण्याचा प्रयत्न केला. मात्र पैसे जमा न होऊ शकल्याने त्याने मानसिक तणावातून अखेर आत्महत्या केली. कन्हान नदीत शव शोधण्यात आले. मनीषचे शव नेरी गावाच्या पुढे १० किलोमीटर अंतरावर आढळून आले. व्हिडिओमध्ये मृतकाने ज्यांची नावं घेतली होती पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे. पोलीस व्हिडिओच्या आधारे पुढील तपास करत आहे

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com