Nagpur
Nagpur

Nagpur : नागपुरात उमेदवारीवरुन हायव्होल्टेज ड्रामा; अर्ज मागे घेऊ नये म्हणून उमेदवार किसन गावंडेंना लोकांनी घरात कोंडलं

आगामी महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Nagpur) आगामी महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. एबी फॉर्मचं वाटप करण्यात आले. अनेकांना उमेदवारी नाकारल्याने इच्छुकांनी नाराजी व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. तसेच उमेदवारी न मिळाल्याने नाराज होत कोणी राजीनामा दिला तर कोणी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरत बंडखोरी केली.काही जणांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला.

यातच आता नागपुरात उमेदवारीवरुन हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. उमेदवारी मागे घेण्यासाठी जाऊ नये म्हणून नागपूरात किसन गावंडे या उमेदवाराला परिसरातील लोकांनी घरात बंद केल्याचे पाहायला मिळत आहे. परिसरातील त्यांच्या समर्थकांनी किसन गावंडे यांच्या घराला कुलूप लावलं. प्रभाग 13 ड मध्ये भाजपने किसन गावंडे आणि विजय होले यांना एबी फॅार्म दिला होता.

पण आता भाजपने वेळेवर किसन गावंडे यांना अर्ज मागे घेण्यास सांगितले. किसन गावंडे यांचा भाजपने दिलेला एबी फॉर्म रद्द झाला आता ते अपक्ष उमेदवार आहेत. पक्षाने त्यांची उमेदवारी मागे घेण्यास सांगितले, पण लोकांनी त्यांना घरात बंद केलं आहे. नागपूर प्रभाग 13 ड मधून किसन गावंडे यांनी उमेदवारी मागे घेऊ नये असा लोकांचा आग्रह आहे.

Summary

  • नागपुरात उमेदवारीवरुन हायव्होल्टेज ड्रामा

  • उमेदवार किसन गावंडेंना लोकांनी घरात कोंडलं

  • अर्ज मागे घेऊ नये म्हणून घरात बंद केलं

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com