धक्कादायक! जनगणनेच्या नावाखाली दोघांनी नायब तहसीलदाराच्या पत्नीलाच लुटले

धक्कादायक! जनगणनेच्या नावाखाली दोघांनी नायब तहसीलदाराच्या पत्नीलाच लुटले

अमरावतीतून धक्कादायक बातमी समोर येत आहे. जनगणनेच्या नावाखाली चाकूच्या धाकावर नायब तहसीलदार यांच्या पत्नीलाच लुटले आहे.

सूरज दहाट | अमरावती : शहरातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. जनगणनेच्या नावाखाली चाकूच्या धाकावर नायब तहसीलदार यांच्या पत्नीलाच लुटले आहे. शहरातील राठी नगर परिसरात ही घटना घडल्याचे समजत आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून तपास सुरु आहे.

धक्कादायक! जनगणनेच्या नावाखाली दोघांनी नायब तहसीलदाराच्या पत्नीलाच लुटले
मोठी बातमी! वंचित आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश; अधिकृत पत्र जारी

माहितीनुसार, आज दुपारी 11 वाजताच्या दरम्यान नायब तहसीलदार प्रशांत अडसूळ यांच्या पत्नी घरी एकटाच असताना दोन तरुण तोंडाला रुमाल बांधून घरी आले. आम्ही जनगणनेच काम करायला आलो आहोत आधार कार्ड दाखवा, असे त्यांना सांगितले. ती महिला घरात जाताच तिला चाकूचा धाक दाखवून घरात बांधून ठेवले व घरातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा 5 लाखाचा ऐवज या चोरट्यांनी दिवसाढवळ्या लुटून नेला आहे.

महिलेच्या तक्रारीवरून गाडगे नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथक देखील रवाना केलेले आहे. घरात येताना हे आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झालेले आहेत. मात्र, तोंडाला रुमाल बांधला असल्याने पोलिसांसमोर या आरोपींना शोधून काढणे एक आव्हान निर्माण झाले आहे.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून सर्व्हे करायला कोणीही अशा प्रकारे आल्यास घराच्या आत घेऊ नये व बाहेरूनच माहिती द्यावी, असे आवाहन गाडगेनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार गजानन गुल्हाने यांनी केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com