उल्हासनगरात शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र, महापालिका निवडणुका एकत्र लढवण्याचा निर्णय

उल्हासनगरात शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र, महापालिका निवडणुका एकत्र लढवण्याचा निर्णय

Published by :
Published on

उल्हासनगर महापालिकेची आगामी निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतला आहे. कलानी परिवाराच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर उल्हासनगरात राष्ट्रवादीची ताकद वाढली असून त्यामुळे शिवसेनेनं निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादीशी हातमिळवणी केल्याची चर्चा यानंतर उल्हासनगरात सुरू आहे.

उल्हासनगर शहराचे माजी आमदार पप्पू कलानी हे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर उल्हासनगर शहरातली राजकीय गणितं मोठ्या प्रमाणात बदलली आहेत.आधी भाजपसोबत असलेल्या कलानी गटानं पप्पू कलानी हे जेलबाहेर येताच तब्बल ३२ नगरसेवकांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला. पप्पू कलानी जेलबाहेर असल्यानं राष्ट्रवादीची ताकद वाढली असेल, मात्र शिवसेनेला त्याचा काही फरक पडत नसून यापूर्वीही पप्पू कलानी शहरात असताना आम्ही निवडणुका लढवल्या आहेत, मागील निवडणुकीत तर भाजपनं सत्तेचा दुरुपयोग करून निवडणुका लढवल्या, तरीही शिवसेनाच सर्वात मोठा पक्ष ठरला, असं त्यांनी स्पष्ट केलं. तर महापौरपदाबाबत विचारलं असता, ज्याचे जास्त नगरसेवक येतील त्याचाच महापौर होईल, असं म्हणत भविष्यात आमचे वरिष्ठ जो काही निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, असंही राजेंद्र चौधरी म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com