दरडग्रस्तांना अखेर मिळाला निवारा,पहिल्या टप्प्यात आज ६२ घरांचा ताबा
अरविंद जाधव, सातारा | अतिवृष्टीग्रस्त गावांतील बाधीत यांना निवास वाटपाचा शुभारंभ आज मंत्री शंभूराज देसाई व सातारा जिल्हा प्रशासनाच्यावतीने पार पडला. यामध्ये पहिल्या टप्प्यात आज ६२ घरांचा ताबा देण्यात आला. तसेच उर्वरित लोकांना देखील लवकरच याचा ताबा देण्यात येणार आहे.
जुलै महिन्यात पाटण तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीत अनेक गावे नुकसानग्रस्त झाली होती. अनेक गावात मनुष्यहानीसह सार्वजनिक, खाजगी मालमत्तेचे नुकसान झाले होते. लोकांना स्थलांतरित करुन शाळा,मंदिरे यात आश्रयास ठेवण्यात आले होते. अनेक गावे धोकादायक स्थितीत होती, तसेच पावसाच्या जोर ही कायम होता. जवळपास ५ हजारांहून आधिक लोकांना आश्रीत करण्यात आले होते. मात्र तीन गावातील लोकांचे संपूर्ण घरांचे प्रशासनाने तत्परता दाखवत त्यांच्या पुनर्वसनाची प्रकिया सुरू केली होती. आज त्या बाधीतांना त्यांच्या तात्पुरता निवाराची चावी ताब्यात देण्यात आली. सध्या हे तात्पुरते पुनर्वसन असून लवकरच त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येणार आहे. सदर निवारा शेड हे सर्व सोयीनुक्त असून यामध्ये पाणी,विज अशा मूलभूत गरजांवर विशेष भर देण्यात आला आहे. जास्तीत जास्त ४ कि.मी.च्या आत कायमस्वरूपी पुनर्वसनावर प्रशासनाने जोर दिल्याचे यावेळी दिसले.