जगातील सर्वात हुशार विद्यार्थ्यांच्या यादीत भारतीय वंशाच्या ‘प्रीशा’चा समावेश; 90 देशांतील मुलांनी दिली होती परीक्षा

जगातील सर्वात हुशार विद्यार्थ्यांच्या यादीत भारतीय वंशाच्या ‘प्रीशा’चा समावेश; 90 देशांतील मुलांनी दिली होती परीक्षा

गातील सर्वात तल्लख विद्यार्थ्यांची यादी बनवणाऱ्या प्रतिष्ठित जॉन्स हॉपकिन्स या संस्थेच्या सेंटर फॉर टॅलेंटेड युथ या यादीमध्ये भारतीय वंशाच्या प्रिशा चक्रवर्ती या 9 वर्षीय अमेरिकेतील विद्यार्थिनीचे नाव समाविष्ट केले आहे.
Published by :
Team Lokshahi

गातील सर्वात तल्लख विद्यार्थ्यांची यादी बनवणाऱ्या प्रतिष्ठित जॉन्स हॉपकिन्स या संस्थेच्या सेंटर फॉर टॅलेंटेड युथ या यादीमध्ये भारतीय वंशाच्या प्रिशा चक्रवर्ती या 9 वर्षीय अमेरिकेतील विद्यार्थिनीचे नाव समाविष्ट केले आहे.

जगभरातील 90 देशांमधील 16 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांची ग्रेड स्तर चाचणी घेण्यात आली होती. यामधून प्रिशाची निवड करण्यात आली आहे. जॉन्स हॉपकिन्स यांच्या द्वारे जाहीर करण्यात आलेल्या मीडिया रिलीझद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. प्रिशा ही कॅलिफोर्नियातील फ्रेमोंट येथील वार्म स्प्रिंग एलिमेंटरी स्कूलची विद्यार्थिनी आहे. CTY टॅलेंट सर्चचा एक भाग म्हणून SAT (शॉलॅस्टिक असेसमेंट टेस्ट), ACT (अमेरिकन कॉलेज टेस्टिंग), शाळा आणि कॉलेज क्षमता चाचणी किंवा तत्सम मुल्यांकनांमध्ये तिच्या कामगिरीबद्दल तिला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

याशिवाय प्रीशा ही जगातील सर्वात जुनी उच्च बुद्धिमत्ता असलेल्या जागतिक स्तरावरील प्रसिद्ध मेन्सा फाउंडेशनची आजीवन सदस्य आहे. प्रमाणित, पर्यवेक्षित IQ किंवा इतर मान्यताप्राप्त बुद्धिमत्ता चाचणीवर 98 व्या टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या फाउंडेशनचे सदस्यत्व त्यांच्यासाठी खुले आहे. तिने वयाच्या सहाव्या वर्षी राष्ट्रीय स्तरावरील NNAT (Naglieri Nonverbal क्षमता चाचणी) मध्ये 99 टक्के गुण मिळवून हे यश संपादन केले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com