BJP
महाराष्ट्र
BJP : भाजपमध्ये इन्कमिंग सुरूच; पुण्याचे माजी महापौर हाती घेणार कमळ?
महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(BJP) महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. याच भाजपमध्ये इन्कमिंग सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्याचे माजी महापौर हाती कमळ घेणार असून पुणे पालिकेच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये इन्कमिंग सुरूच आहे.
22 डिसेंबरला मुंबईत पुन्हा भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार आहे. पुण्यातील एका पक्षाचे शहराध्यक्षही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली असून पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
यासोबतच पुण्यातील 4 ते 5 नगरसेवक देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.
Summery
पुण्याचे माजी महापौर हाती घेणार कमळ?
पुणे पालिकेच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये इन्कमिंग सुरूच
22 डिसेंबरला मुंबईत पुन्हा होणार प्रवेश
