अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचा विक्रम
उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात २.६८,९२३ विद्यार्थी अमेरिकेत गेल असून हा सर्वकालीन उच्चांक आहे.
उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. २०२२-२३ या शैक्षणिक वर्षांत २,६८,९२३ विद्यार्थी अमेरिकेत गेले असून हा सर्वकालीन उच्चांक आहे. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाच्या तुलनेत २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अमेरिकेत शिकला या १० लाखांहून अधिक परदेशी विद्यार्थ्यांपैकी भारतीय विद्यार्थ्यांचे प्रमाण २५ टक्क्यांहून अधिक आहे आणि सलग तिसऱ्या वर्षी उच्च शिक्षण घेण्यासाठी विक्रमी संख्येने भारतीय विद्यार्थ्यांनी या देशात प्रवास केला आहे, असे ओपन डोअर्स अहवालात म्हटले आहे.
२००९-१० नंतर प्रथमच अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय पदवीधर विद्यार्थ्यांचा सर्वात मोठा स्रोत बनण्यासाठी भारताने चीनला मागे टाकले आहे. भारतीय पदवीधर विद्यार्थ्यांची संख्या ६३ टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास ६४ हजार विद्यार्थ्यांची वाढ झाली आहे. तर भारतीय पदवीधर विद्यार्थ्यांची संख्याही १६ टक्क्यांनी वाढली आहे.