टोलच्या दरात 'इतकी' वाढ; मध्यरात्रीपासून टोल दरवाढ लागू

लोकसभा निवडणुकीचं मतदान संपताच टोलच्या दरात वाढ करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीचं मतदान संपताच टोलच्या दरात वाढ करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मध्यरात्रीपासून टोल दरवाढ लागू करण्यात आली आहे.

टोलच्या दरात 3 ते 5 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. टोलनाक्यांवर ३ ते ५ टक्के अधिक टोल आकारला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

देशभरात जवळपास 1100 टोलनाके आहेत. रविवारी रात्री १२ वाजल्यापासून टोल दरवाढ लागू केली गेली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com