Kolhapur : स्वातंत्र्य दिनी कोल्हापुरकरांचा अजब रेकॉर्ड, केली तब्बल 'इतकी' जिलेबी फस्त

Kolhapur : स्वातंत्र्य दिनी कोल्हापुरकरांचा अजब रेकॉर्ड, केली तब्बल 'इतकी' जिलेबी फस्त

जिलेबी वाटून स्वातंत्र्य दिनाचा आनंद साजरा करण्यात कोल्हापूरकरांचा हात कोणी धरू शकणार नाही.

सतेज औंधकर, कोल्हापूर: जिलेबी वाटून स्वातंत्र्य दिनाचा आनंद साजरा करण्यात कोल्हापूरकरांचा हात कोणी धरू शकणार नाही. कोल्हापूर आणि जिलेबीच नातं तसं जून आहे. कोणत्याही सुखद क्षणाला कोल्हापूरकर जिलेबीचा वापर करतात. स्वातंत्र्य दिनाच्या ह्या विशेष दिवसानिमित्त कामगार, आप्तस्वकीय आणि शालेय विद्यार्थ्यांना दरवर्षी सुमारे 90 हजार किलो जिलेबी वाटली जाते.

कुस्तीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरात कुस्तीच्या विजयाचा आनंद साजरा करायच्या निमित्ताने जिलेबीचे आगमन झाले ते आजही कायम आहे. 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट या दोन दिवशी जिलेबीची प्रचंड मागणी सर्वच स्तरातून होत असते. जिल्ह्यात सुमारे 90 हजार किलोपर्यंतची जिलेबी विक्री या दिवसात होते.

अनेकांनी कालपासूनच जिलेबीची ऑर्डर द्यायला सुरवात केली आहे. दुकानाच्या बाहेर जिलेबीची टेस्ट घेऊन त्याच बुकिंग करायला रांगा लागल्या आहेत. स्वातंत्र्य दिनासारखा विशेष दिवस सर्वांना जिलेबी वाटून साजरा करण्याची प्रथाच जणू कोल्हापुरात सुरु झाली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com