Independence Day 2025
महाराष्ट्र
Independence Day 2025 : आज भारत देशाचा 79 वा स्वातंत्र्यदिन; संपूर्ण देशात मोठ्या उत्साहाचं वातावरण
भारत आज 15 ऑगस्ट 2025 रोजी 79 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे.
Independence Day 2025 : भारत आज 15 ऑगस्ट 2025 रोजी 79 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज स्वातंत्र्यदिनी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करणार आहेत. मोदी दिल्लीतील लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून सलग 12 व्या वेळी राष्ट्राला संबोधित करतील.
दिल्लीतील लाल किल्ल्यावर होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी विविध मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. यावेळीची थीम 'नवीन भारत' आहे. या थीमवर आधारित असणार आहे. जो देशाची प्रगती, आत्मनिर्भरता आणि 2047 पर्यंत विकसित भारताचे ध्येय दाखविणारा असणार आहे.
पंतप्रधान राष्ट्रीय ध्वज फडकावतील आणि लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करतील. हा ऐतिहासिक दिन देशभरात मोठ्या उत्साहात, जल्लोषात साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर सगळीकडे मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.