Railway Ticket Price Hike
महाराष्ट्र
Railway Ticket Price Hike : रेल्वेचा लांब पल्ल्याचा प्रवास महागणार, 1 जुलैपासून होणार भाडेवाढ
रेल्वेचा लांब पल्ल्याचा प्रवास आता महागणार आहे.
(Railway Ticket Price Hike ) रेल्वेचा लांब पल्ल्याचा प्रवास आता महागणार आहे. 1 जुलैपासून रेल्वेची भाडेवाढ होणार असून नॉन-एसी मेल, एक्स्प्रेसच्या दरात प्रति किलोमीटर 1 पैशाची वाढ होणार असल्याची माहिती मिळत आहे. तर एसी क्लासच्या तिकिटामध्ये प्रति किलोमीटर 2 पैशांची वाढ करण्यात येणार आहे.
या निर्णयाची 1 जुलैपासून अंमलबजावणी केली जाणार आहे. सेकंड क्लासच्या 500 किमी. पर्यंतच्या अंतरापर्यंत कसलीही भाडेवाढ झालेली नाही, मात्र द्वितीय श्रेणीसाठी 500 किमीपेक्षा जास्त अंतराकरिता प्रति किमी 0.50 पैशांची भाडेवाढ लागू होणार आहे.
ही जी भाडेवाढ करण्यात आली आहे ती लांब पल्ल्याच्या गाड्या आणि एसी गाड्यांसाठी लागू असेल. उपनगरीय रेल्वेचे तिकीट आणि मासिक पासच्या दरामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याची माहिती मिळत आहे.