India Women Team
India Women Team

India Women Team : भारतीय क्रिकेट महिला संघातील खेळाडू आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भारतीय क्रिकेट महिला संघातील खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • टीम इंडियाने महिला विश्वचषक 2025चं जेतेपद पटकावलं

  • आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भारतीय क्रिकेट महिला संघातील खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार

(India Women Team ) नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर महिला वनडे विश्वचषक २०२५ चा अंतिम सामना खेळवला गेला. अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ५५ धावांनी पराभव केला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने महिला विश्वचषक 2025चं जेतेपद पटकावलं.

याच पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट महिला संघातील खेळाडू आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भारतीय क्रिकेट महिला संघातील खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार असून मंत्रिमंडळ बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील संघातील खेळाडूंना रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्याची घोषणा केली होती. काल भारतीय क्रिकेट महिला संघातील खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com