Bhambavli Vajrai waterfall | भारताचा सर्वात उंच धबधबा ओसंडून वाहतोय!

Bhambavli Vajrai waterfall | भारताचा सर्वात उंच धबधबा ओसंडून वाहतोय!

Published by :
Published on

प्रशांत जगताप | भारतातील सर्वात उंच 1840 फूट उंच म्हणजेच 540 मीटरचा भांबवली वझराई धबधबा ओसंडून वाहू लागला आहे. सध्या कोरोनामुळे हा धबधबा पर्यटकांविना वाहत असून लोकशाहीच्या प्रेक्षकांसाठी खास निसर्गरम्य धबधबा घेऊन आलो आहोत.

सातारा जिल्ह्यात पावसाने जोरदार मुसंडी मारली असून जिल्ह्याच्या पश्चिमेला असलेला भारतातील सर्वात उंच भांबवली धबधबा ओसंडून वाहू लागला आहे..या धबधब्याची उंची तब्बल 1840 फूट म्हणजेच 560 मीटर आहे. या धबधब्याला 3 पायऱ्या असून हा धबधबा सरळ उभ्या दगडावरून वाहतो. उरमोडी नदी या धबधब्याच उगम स्थान असून जगप्रसिद्ध असलेल्या कास पुष्प पठारापासून 5 किमी दूर आहे. सध्या कोरोनामुळे हा धबधबा पर्यटकांविना वाहत आहे. मात्र लोकशाहीच्या प्रेक्षकांसाठी खास निसर्गरम्य धबधबा पाहण्याची ही संधी आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com