Indurikar Maharaj
Indurikar MaharajTeam Lokshahi

Indurikar Maharaj : इंदुरीकर महाराजांना 'ते' विधान करणं भोवलं, कोर्टाने दिला 'हा' निर्णय

Indurikar Maharaj: स्त्रीसंग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते. असे विधान इंदुरीकर महाराजांनी केले होते.
Published by :
Sagar Pradhan
Published on

छ. संभाजीनगर: कीर्तनकार इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनाने नेहमीच चर्चेत असतात. विशेष म्हणजे त्यांच्या या कीर्तनाला नागरिकांची प्रचंड गर्दी असते. मात्र, काही वेळा त्यांचे विधान चांगलेच चर्चेत येतात. परंतु, आता अशाच एका वक्तव्यामुळे कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. इंदुरीकर महाराजांनी कीर्तनातून लिंगभेदावर भाष्य केले होते. त्यावर त्या विधानावरून अंधश्रद्धा निर्मुलन समितीने औरंगाबाद न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर आज सुनावणी झाली. इंदुरीकर महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, असे आदेश औरंगाबाद कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे इंदुरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल होणार असून त्यांच्या अडचणीत चांगली वाढ झाली आहे.

Indurikar Maharaj
Deepak Kesarkar : दादांनी चांगलं माध्यम निवडलं पाहिजे, ते माध्यम म्हणजे... - दीपक केसरकर

काय म्हणाले होते इंदुरीकर महाराज?

एका कीर्तनात बोलताना इंदुरीकर महाराज म्हणाले होते की, स्त्रीसंग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्रीसंग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब, असं सांगत, पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला. तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्षपू नावाचा राक्षस जन्माला आला. हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला, असे विधान त्यांनी केले होते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com