Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेत तब्बल 165 कोटी रुपये अपात्र लाभार्थ्यांनी लाटले; महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची लेखी उत्तरात कबुली
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Ladki Bahin Yojana ) लाडकी बहिण योजनेत तब्बल 165 कोटी रुपये अपात्र लाभार्थ्यांनी लाटले अशी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची लेखी उत्तरात कबुली दिली आहे. 12 हजार 431 पुरुषांनी 25 कोटी रुपये तर 77 हजार अपात्र महिलांनी 140 कोटी, तर 9526 शासकिय महिला कर्मचाऱ्यांनी 14.50 कोटी रुपये लाटल्याची माहिती दिली आहे.
शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्याकडून या पैशांची वसुली करून त्यांच्यावरती रितसर कारवाई केली जाणार असल्याचं अदिती तटकरे यांनी सांगितले. तर प्रत्येक गावात जिल्हा बँके मार्फत लाडक्या बहिणींना एक लाख रुपयांच बिनव्याजी कर्ज देण्याची मुख्यमंत्री यांची घोषणा कागदोपत्री या योजना संदर्भात मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली मात्र अद्यापही शासन निर्णय जारी केला नाही, अशी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची लेखी उत्तरात माहिती दिली आहे.
Summery
'लाडकी बहीण योजनेत 165 कोटी लाटले'
'अपात्र लाभार्थ्यांनी 165 कोटी रुपये लाटल्याची माहिती'
मंत्री अदिती तटकरे यांची लेखी उत्तरात कबुली
