Ajit Pawar : अजित पवारांच्या दिल्ली दौऱ्याची इनसाईड स्टोरी
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Ajit Pawar ) सध्या राज्यात राष्ट्रवादी पक्ष पक्ष एकत्र येणार असल्याची अनेकदा चर्चा होत असते. शरद पवार आणि अजित पवार अनेकदा वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी एकत्र येत असतात. यातच अजित पवार काल दिल्ली दौऱ्यावर गेले असून अजित पवार यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या.
अजित पवार यांच्या दिल्ली दौऱ्या दरम्यान काही राजकीय भेटीगाठी झाल्याची माहिती मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता अजित पवारांच्या दिल्ली दौऱ्यातील इनसाईड स्टोरी समोर आली असून 12 डिसेंबरला राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांचा वाढदिवस असून वाढदिवसानिमत्त दिल्लीत काल स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.
याच वाढदिवसाच्या निमित्ताने शरद पवार यांनी सर्व खासदारांना तसेच नेत्यांना स्नेहभोजनाचे निमंत्रण दिलेले होते. या स्नेहभोजनासाठी अजित पवार देखील उपस्थित होते. यावेळी काका पुतण्यामध्ये गुप्त बैठक झाल्याची माहिती मिळत असून 20 मिनिटे दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. दोघांमध्ये राजकीय कौटुंबिक चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात याची चर्चा रंगली आहे.
Summery
अजित पवारांच्या दिल्ली दौऱ्यातील इनसाईड स्टोरी
काका पुतण्या मध्ये झाली गुप्त बैठक
20 मिनिटे दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती
