महाराष्ट्र
Radhakrishna Vikhe On Sharad Pawar : 'समाजा-समाजात भांडणं लावण्याचं काम शरद पवारांचं...'
आगामी निवडणुकीत मूळ ओबीसी यांनाचं उमेदवारी देऊ असे निर्देश शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत देण्यात आल्याचे बोलले जात आहे. यावरून आता मंत्री राधाकृष्ण विखे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
आगामी निवडणुकीत मूळ ओबीसी यांनाचं उमेदवारी देऊ असे निर्देश शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत देण्यात आल्याचे बोलले जात आहे. यावरून आता मंत्री राधाकृष्ण विखे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी ते म्हणाले की, "मराठा समाजाला आरक्षण नाकारण्याच पाप शरद पवार साहेबांचंचं आहे. 94 साली मंडल आयोगाच्या शिफारशीनंतर आरक्षण राज्यामध्ये घेतलं त्याच्यात समावेश केला असता तर आज जी जातीयवादाची दरी आणखीन होतं चाललेली आहे ती वाढली नसती. मात्र समाजा समाजात भांडण लावण्याचे काम त्यांनी आयुष्यभर केलं इतके वर्ष मराठ्यांचे नेता म्हणून ते मिरवत होतें आणि आज त्याचं समाजावर अन्याय करण्याची भूमिका घेत आहेत आता त्याच्याबद्दल काय करायचं तो निर्णय समाजाने घ्यायचा आहे.." अशी प्रतिक्रिया मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली आहे.