जळगावच्या गुन्हेगारीवर बसणारा आळा;गुन्हेगारी संपवण्यासाठी मास्टर प्लान
मंगेश जोशी | जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारी व शस्त्राच्या धाकावर वाढणारी गुन्हेगारी संपवण्यासाठी मास्टर प्लान आखला जाणार असून मोक्का, एम पी डी ए, हद्दपारी यासारख्या कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक बीजी शेखर यांनी जळगाव येथे आज पत्रकार परिषदेत दिली आहे.
जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या गोळीबारात बाबत नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक बीजी शेखर हे जळगाव दौऱ्यावर आले असून जळगाव जिल्ह्यातील दोन्ही गोळीबाराच्या घटना पूर्ववैमनस्यातून घडलेल्या असून त्यामुळे गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अवैध शस्त्र बाळगणे गुन्हे करणारे सर्व गुन्हेगारांच्या पाच वर्षाच्या कुंडल्या काढून त्या गुन्हेगारांचा शोध घेतला जाणार असून व जामिनावर सुटलेले गुन्हेगार यांचादेखील शोध घेतला जाणार असून प्रत्येक पोलीस स्टेशनला दत्त गुन्हेगार योजना लागू करून पोलीस कर्मचाऱ्यांना गुन्हेगार तपासणीसाठी दत्तक योजनेत या माध्यमातून दिले जाणार आहे. तसेच अवैध शस्त्र वापरणाऱ्या विरोधात आता मास्टर प्लॅन तयार असून काही दिवसात याबाबतची कार्यवाही केली जाणार असल्याची याप्रसंगी पोलीस महानिरीक्षक बीजी शेखर यांनी म्हटले आहे.
जळगाव जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अवैध सावकारीला बळी पडलेल्यांनी पुढे यावे व अवैध सावकारी विरुद्ध पोलिसांच्या वतीने कडक पावले उचलल्या जाणार असल्याचेही यावेळी बीजी शेखर म्हणाले .