आरोग्य क्षेत्रात जपानने अर्थसहाय्य करावे- आरोग्यमंत्री राजेश टोपे

आरोग्य क्षेत्रात जपानने अर्थसहाय्य करावे- आरोग्यमंत्री राजेश टोपे

Published by :
Published on

राज्यातील पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना जपानच्या जायका संस्थेमार्फत अर्थसहाय्य केले जात आहे. त्याच धर्तीवर राज्यातील विशेषत: कर्करोग उपचारावरील सुविधांच्या उभारणीसाठी सहकार्य करावे, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जपानचे मुंबईतील वाणिज्यदूत डॉ. फुकाहोरी यासुक्ता यांच्याकडे केली आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत त्यांनी हि मागणी केली. यावेळी आरोग्यमंत्र्यांनी कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर जपान मधील लसीकरणाची स्थिती, लॉकडाऊन, आरोग्य सुविधा याबाबत माहितीही जाणून घेतली.

महाराष्ट्र आणि जपानचे नेहमीच सहकार्याचे संबंध राहीले आहेत. पर्यटन तसेच पायाभूत सुविधांच्या विकासकामांसाठी जपान सरकारच्या 'जायका' संस्थेमार्फत अर्थसहाय्य केले जात आहे. त्यामध्ये मुंबईतील मेट्रो सारख्या प्रकल्पांचा समावेश आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य क्षेत्राचे महत्व लक्षात घेता राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या उभारणीसाठी 'जायका'कडून अर्थसहाय्य मिळाल्यास त्याचा या क्षेत्राला लाभ होईल. राज्य कामगार आरोग्य विभागाच्या वरळी आणि मुलुंड येथील जागेवर सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल उभारणीसाठी देखील जायकाकडून आर्थिक सहाय्य मिळावे, असे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. तसेच कर्करोग उपचारासाठी रेडीएशन थेरपी उपचाराकरीता प्रत्येक जिल्ह्यात यंत्रणा उभारणीसाठी जपान कडून तंत्रज्ञान आणि अर्थसहाय्य उपलब्ध करून देतानाच जालना येथे कर्करोग उपचार रुग्णालय उभारणीकरीता सहकार्य करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com