जरंडेश्वर साखर कारखाना कर्ज प्रकरण; आता सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला ईडीची नोटीस
समीर महाडेश्वर | जरंडेश्वर साखर कारखाना कर्ज प्रकरणी राज्यातील काही जिल्हा मध्यवर्ती बँका ईडीच्या रडारवर आहेत. यात यापूर्वी पुणे आणि सातारा जिल्हा बॅंकेला ईडीची नोटीस बजावली आहे. त्यांनतर आता ईडीने सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला नोटीस बजावली आहे.
जरंडेश्वर प्रकरणी ईडी अॅक्शन मोडवर आली आहे. साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातील चिमणगावमधल्या चर्चित जरंडेश्वर कारखान्याच्या कर्ज प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ईडीने सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला नोटीस पाठवलेली आहे. त्यांनतर पुणे जिल्हा बॅंकेला नोटीस पाठवली आहे. त्यांनतर आता सिंधुदुर्ग जिल्हा बँक ईडीच्या रडारवर आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेला देखील ईडी कडून पत पुरवठ्याबाबत नोटीस बजावण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही सध्या शिवसेनेच्या ताब्यात आहे. या पार्श्वभूमीवर या घडामोडींना महत्त्व प्राप्त झाले आहे. दरम्यान याप्रकरणी आता पुढे काय घडामोडी घडतात, ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.