Jay Pawar - Rutuja Patil wedding : जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा शाही विवाहसोहळा; बहरीनमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडणार
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Jay Pawar - Rutuja Patil wedding) युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा विवाह सोहळा ३० नोव्हेंबर रोजी मुंबईत पार पडला. या लग्न सोहळ्याला पवार कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते. आता अजित पवार यांचे धाकटे सुपूत्र जय पवारांचा लग्नसोहळा आहे.
जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा 4, 5 आणि 7 डिसेंबर रोजी बहरीनमध्ये पार पडणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील निवडक नेत्यांमध्ये सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनाच निमंत्रण गेल्याची माहिती मिळत आहे. या डेस्टिनेशन वेडिंगसाठी केवळ ४०० मोजक्या पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आले आहे.
डेस्टिनेशन वेडिंगसाठी केवळ मोजक्या पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आले असून यामध्ये काल मेहंदी पार पडली. आज हळद असेल. तर 6 डिसेंबरला मुख्य लग्न सोहळा असणार आहे. ७ डिसेंबरला स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
Summery
जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा शाही विवाहसोहळा
बहरीनमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडणार
डेस्टिनेशन वेडिंगसाठी केवळ मोजक्या पाहुण्यांना निमंत्रण
