Jaykumar Gore : सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे सोलापुरात तळ ठोकून; महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी रणनिती
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Jaykumar Gore) महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
अनेक पक्ष जोरदार प्रचाराला लागले असून सभा, रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. मुंबई पालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून याच पार्श्वभूमीवर आता सोलापूर महापालिका महायुतीच्या ताब्यात ठेवण्यासाठी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे सोलापुरात तळ ठोकून असल्याचे पाहायला मिळत आहे.
महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी रणनीती आखण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. अनेक गोपनीय बैठका आणि जोडण्या करण्यासाठी त्यांनी विशेष लक्ष सोलापूरात केंद्रित केला आहे.
Summary
महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले
सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे सोलापुरात तळ ठोकून
महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी रणनिती
