Jayant Patil : व्यापाऱ्यांना तारा आणि शेतकऱ्यांना मारा असा या सरकारचा नारा

Jayant Patil : व्यापाऱ्यांना तारा आणि शेतकऱ्यांना मारा असा या सरकारचा नारा

कांदा निर्यात बंदी अखेर हटवण्यात आली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

कांदा निर्यात बंदी अखेर हटवण्यात आली आहे. देशातील कांद्याच्या किंमतींना लगाम घालण्यासाठी सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणली होती. 31 मार्च 2024 पर्यंत ही निर्यात बंदी लागू करण्यात आली होती. आता कांद्यावरील निर्यात बंदी उठविण्यात आली आहे. केंद्र सरकारने 3 लाख मॅट्रिक टन कांदा निर्यातीला मंजुरी दिली आहे.

यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता जयंत पाटील यांनी ट्विट करत म्हणाले आहे की, कांदा निर्यातबंदी उठवली म्हणून काही जण उगाच टाळ्या वाजवत होते. सत्य परिस्थिती ही आहे की, कांदा निर्यातबंदी उठवलीच गेली नाही. राज्यात चालू रब्बी हंगामात चार लाख ३२ हजार ७९८ हेक्टरवर कांदा लागवड झाल्याची माहिती आहे.

त्यातून हंगाम अखेर सुमारे ८६ लाख टन कांदा उत्पादनाचा अंदाज आहे. सरकार निर्यातबंदी कायम ठेवत असेल तर कांद्याच्या दरात आणखी घसरण होऊ शकते व शेतकऱ्यांचे पुन्हा नुकसान होऊ शकते. व्यापाऱ्यांना तारा आणि शेतकऱ्यांना मारा असा या सरकारचा नारा. असे म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com