MCA Election : Jitendra Awhad
MCA Election : Jitendra Awhad

MCA Election : Jitendra Awhad : मुंबई क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली Scoll करा...

(MCA Election ) मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यातच आता मुंबई क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड यांची निवड करण्यात आली आहे. तर एमसीएच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची या आधीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी नवीन शेट्टी यांचा 48 मतांनी पराभव केला. संयुक्त सचिव म्हणून निलेश भोसले यांची निवड झाली आहे तर सचिव पदावर उन्मेष खानविलकर यांची निवड करण्यात आली. मिलिंद नार्वेकर यांची देखील कार्यकारीणी सदस्यपदी निवड झाली आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत एकूण 362 जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक 12 नोव्हेंबरला पार पडली. यामध्ये 14 पदांसाठी 30 उमेदवार रिंगणात होते. यामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. अजिंक्य नाईक यांच्या गटातील 12 तर आशिष शेलार यांच्या गटातील 4 जणांनी विजय मिळवला. शरद पवार आणि आशिष शेलार यांच्यामध्ये देखील बैठक झाली होती ज्यामधून काही नावे निवडण्यात आली होती.

एम.सी.ए निवडणूक अंतिम निकाल

अध्यक्ष : अजिंक्य नाईक (बिनविरोध)

उपाध्यक्ष - जितेंद्र आव्हाड - २०१

नविन शेट्टी - १५५

सचिव - डॉ उन्मेष खानविलकर - २२७

शाह आलम शेख - १२९

सह सचिव - निलेश भोसले - २२८

गौरव पाय्याडे - १२८

खजिनदार - अरमान मलिक - २३४

सुरेंद्र शेवाळे - ११९

गव्हर्निंग कॉन्सिल

भरत किनी - १८४

किशोर जैन - १३२

अपेक्स कॉन्सिल

संदीप विचारे - २४७

संमत - २४६

विघ्नेश कदम - २४२

मिलिंद नार्वेकर - २४१

भूषण - २०८

नदीम मेनन - १९८

विकास रेपाळे - १९५

प्रमोद - १८६

Summery

मुंबई क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड

आव्हाडांनी नवीन शेट्टींचा केला 48 मतांनी पराभव

एकूण 362 जणांनी बजावला मतदानाचा हक्क

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com