MPSCची संयुक्त पूर्व परीक्षा

MPSCची संयुक्त पूर्व परीक्षा

Published by :
Team Lokshahi

महाराष्ट्र (Maharashtra) लोकसेवा आयोगामार्फत ३ एप्रिल, २०२२ रोजी महाराष्ट्रातील एकूण ९२१ उपकेंद्रांवर महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा (Pre-Examination) २०२१ घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी सुमारे ३ लाख ८ हजार २३६ उमेदवारांना candidates प्रवेश देण्यात आला आहे.

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२१ मधून उद्योग संचालनालयात उद्योग निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभागात दुय्यम निरीक्षक, विमा संचालनालयात तांत्रिक सहायक तसेच कर सहायक, लिपिक-टंकलेखक (मराठी/इंग्रजी) या गट-क संवर्गातील पदे भरण्यात येणार आहेत. या परीक्षेमध्ये गैरव्यवहार व अनुचित प्रकार होऊ नये यासाठी आयोगातर्फे प्रत्येक जिल्हा केंद्रासाठी शासन सेवेतील वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांची विशेष निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com