ज्योती देवरेंच्या अडचणीत वाढ; लाचलुचपत विभागात तक्रार दाखल

ज्योती देवरेंच्या अडचणीत वाढ; लाचलुचपत विभागात तक्रार दाखल

Published by :
Published on

स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासनातले अधिकारी यांच्या संदर्भात आरोप करून आत्महत्या करू या आशयाची ऑडिओ क्लिप व्हायरल करणाऱ्या पारनेरच्या बदली झालेल्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या विरोधात अहमदनगरच्या लाचलुचपत विरोधी विभागात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

देवरे यांनी आपल्या कार्यकाळात पदाचा दुरुपयोग केला आहे. वाळू तस्करी बाबतीत त्यांची अनियमत्ता समोर आलेली आहे. याबाबत अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी देवरे यांचा चौकशी अहवाल वरिष्ठांकडे पाठवलेला आहे. एकंदरीत याबद्दल असलेले पुरावे या आधारे तक्राररदार कारभारी पोटघन यांनी पुण्याचे प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांच्या मार्फत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com