‘या’ दिवसांमध्ये रंगणार ‘काळा घोडा आर्ट फेस्टिव्हल’

‘या’ दिवसांमध्ये रंगणार ‘काळा घोडा आर्ट फेस्टिव्हल’

Published by :

काला घोडा आर्ट फेस्टिव्हल (KGAF) हा भारतातील सर्वात मोठा सांस्कृतिक स्ट्रीट फेस्टिव्हल म्हणून ओळखली जातो. यंदा हा फेस्टिव्हल  काळा घोडा फोस्टीव्हल पुढील वर्षीच्या 5 ते 13 फेब्रुवारी 2022 महिन्यात आणखी भव्य स्वरुपात आणि मोठ्या विस्तारात आयोजित केला जाणारा आहे. काळा घोडा फेस्टिवल डिझाइन, सिनेमा, नाटक, नृत्य, साहित्य आणि अनेक विविध प्रकारांतून रसिकांच्या भेटीस येत आहे.

मुंबईच्या इतिहासात काळा घोडा कला महोत्सवाचे खूपच महत्वाचे स्थान आहे.काळा घोड्यातील रस्त्यांचे रुपांतर एका जत्रेत होईल आणि प्रत्येकाचे मनोरंजन होईल यात शंका नाही. फेब्रुवारी २०२२ मध्ये काळा घोडा आर्ट फेस्टीव्हल एका नव्या 'उडान' थीमसह समोर येणार आहे. कला, संस्कृती, वारसा, नाटक, गाणे आणि नृत्याची रेलचेल असलेला हा फेस्टीव्हल तुमची वाट पाहाणार आहे.

गेल्या वर्षी कोरोनामुळे संपूर्ण जग बंद झाले होते. मात्र काळा घोडा फेस्टीव्हलमध्ये खंड पडला नाही. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत जगातील सर्वात मोठ्या बहुसांस्कृतिक महोत्सवांपैकी एक असलेला काळा घोडा आर्ट फेस्टिव्हल (KGAF) त्याच्या डिजिटल अवतारासह जागतिक झाला होता आणि नऊ दिवसांमध्ये ७० हून अधिक ऑनलाइन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यंदाही काळा घोडा आर्ट कार्ट ने बाजारपेठेला सुरुवात केली जाणार असली तरी यंदाही स्टॉल आभासी असणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com