Kannada Ghat; नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करून मदत जाहीर करणार; अब्दुल सत्तार यांनी ‘लोकशाही न्यूज’ला दिली माहिती
मंगेश जोशी | धुळे-सोलापूर महामार्गावर कन्नड (औट्रम) घाटात जवळपास आठ ठिकाणी दरड कोसळल्याची घटना घडली. त्यामुळे अनेक वाहने या घाटात अडकली असून, सध्या प्रशासनाच्या वतीने हा मार्ग मोकळा करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. दरम्यान राज्याचे ग्रामविकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी कन्नड घाटात पाहणी केली. दरम्यान नुकसानग्रस्त भागाची तातडीने पंचनामे करून शासनाच्या वतीने मदत जाहीर करणार असल्याचे यावेळी अब्दुल सत्तार यांनी लोकशाही न्यूजला बोलताना सांगितले.
गेल्या काही दिवसापासून जाम होणारा कन्नड घाट (Kannada Ghat) अतिवृष्टीमुळे दरड कोसळल्याने ठप्प झाला आहे. (Heavy Rain)तब्बल सात ते आठ ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. प्रचंड पडणारा पाऊस आणि कोसळणाऱ्या दरडी(landslide) यामुळे घाटात अनेक वाहने अडकली. त्यामुळे घाटातील दोन्ही बाजुंनी वाहतुक बंद करण्यात आली असून घाटातील दरड काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
दरम्यान राज्याचे ग्रामविकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी कन्नड घाटात पाहणी केली. दरम्यान नुकसानग्रस्त भागाची तातडीने पंचनामे करून शासनाच्या वतीने मदत जाहीर करणार असल्याचे यावेळी अब्दुल सत्तार यांनी लोकशाही न्यूजला बोलताना सांगितले आहे.

