कर्जत ते मुंबई रेल्वेसेवा दीड तासांपासून विस्कळीत

कर्जत ते मुंबई रेल्वेसेवा दीड तासांपासून विस्कळीत

Published by :
Published on

अंबरनाथ रेल्वे स्थानकात कोयंबतूर एलटीटी एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्यामुळे कर्जतहून मुंबईकडे जाणारी रेल्वेसेवा गेल्या दीड तासांपासून ठप्प झाली आहे. रेल्वेसेवा उशिराने सुरु असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय. तसेच रेल्वे सेवा 15 मिनिटे उशिराने सुरु असून युद्ध पातळीवर रेल्वे सेवा पुर्ववत करण्याचे काम सुरु आहे.

कर्जतहून मुंबईकडे जाणारी रेल्वेसेवा गेल्या दीड तासांपासून ठप्प, कोयंबतूर एलटीटी एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड झाली आहे. त्यामुळे 12.47 वाजता पासून एक्स्प्रेस अंबरनाथ स्थानकात उभी आहे. कर्जतहून मुंबईकडे जाणारी रेल्वेसेवा मागील दीड तासांपासून ठप्प आहे. प्रवाशांना ताटकळत उभे रहावे लागत आहे. तसेच मुंबई ते कर्जत रेल्वेसेवा 20 मिनिटे उशिराने सुरु आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com