दापोली तालुक्यातील केळशी गावात पावसाचा हाहाकार; घरांमध्ये शिरलं पाणी

दापोली तालुक्यातील केळशी गावात पावसाचा हाहाकार; घरांमध्ये शिरलं पाणी

दापोली तालुक्यातील केळशी गावात मुसळधार पावसामुळं घरांमध्ये आणि बाजारपेठेत पाणी घुसले आहे. गेल्या बारा तासांपासून अधिक काळ या भागात मुसळधार पाऊस कोसळतो आहे.
Published on

दापोली : दापोली तालुक्यातील केळशी गावात मुसळधार पावसामुळं घरांमध्ये आणि बाजारपेठेत पाणी घुसले आहे. गेल्या बारा तासांपासून अधिक काळ या भागात मुसळधार पाऊस कोसळतो आहे. त्यामुळं या पावसानं सर्वत्र दाणादाण उडाली असून केळशीतील कुंभारवाडा परिसरामध्ये अनेकांच्या घरांमध्ये पाणी घुसल्यामुळे तारांबळ उडाली आहे. मुसळधार पाऊस थांबत नसल्यानं आता नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com