खान्देशचे कुलदैवत कानुबाई उत्सवाला नंदुबारमधून सुरुवात
सणांचा महिना श्रावण सुरु होताच खान्देशातील ग्रामदैवत कानबाई मातेचा उत्सव मोठ्या उत्साहात श्रावणसरी सोबत नंदुरबार धुळे आणि जळगाव जिल्ह्यात संपन्न झाला. कोकणात सर्व चाकरमाने गणपती उत्सवाला आपल्या गावाकडे परततात मुबंईत गौरी गणपतीच्या सणाप्रमाणेच खान्देशात कानबाई उत्सव साजरा करण्यासाठी कुटुंबातील सदस्य आपल्या घराकडे न चुकता येतात. अवघ्या दीड दिवसांचा हा सण साजरा केला जातो
खान्देशातील सर्वात प्रसिद्ध असे ग्रामदैवत म्हणून कानबाई मातेचा लौकिक आहे. या कानबाई मातेची फक्त तीनच मंदिर आहेत. निसर्गपूरक असा हा कानबाईचा सण खान्देशात श्रावण महिन्यात नागपंचमी नंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो.
पंधरा दिवस आधी घरात सणानिमित्त केली जाते अत्यंत पवित्र आणि स्वच्छ वातावरणात सुहासिनी मातेची स्थापना करतात. कानुबाई उत्सव अवघ्या दीड दिवसाचा सण असल्याने रविवारच्या स्थापनेस आज जिल्ह्यात सर्वत्र विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. जात पात धर्म बाजूला ठेवून अत्यंत पवित्र असा हा कानबाई उत्सव खान्देशात मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला.