दीड कोटीसाठी मुलाचे अपहरण; असा लावला पोलिसांनी छडा

दीड कोटीसाठी मुलाचे अपहरण; असा लावला पोलिसांनी छडा

दीड कोटीसाठी एका व्यावसायिकाच्या 12 वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याची घटना डोंबिवलीत घडली होती. पोलिसांचे 20 पथक मुलाच्या सुटकेसाठी आरोपींच्या शोधात होते.

सुरेश काटे | कल्याण : दीड कोटीसाठी एका व्यावसायिकाच्या 12 वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याची घटना डोंबिवलीत घडली होती. पोलिसांचे 20 पथक मुलाच्या सुटकेसाठी आरोपींच्या शोधात होते. अखेर 75 तासांच्या अथक परिश्रमानंतर मानपाडा पोलिसांना सुरत मधून अल्पवयीन मुलाची सुटका करण्यात यश आले आहे. या प्रकरणी 5 सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पाच आरोपींमध्ये तीन महिलांचा देखील समावेश आहे.

डोंबिवली पूर्वेतील एमआयडीसी परिसरात राहणारे व्यवसायिक रणजीत झा यांच्या 12 वर्षीय मुलाचे क्लासमधून 9 नोव्हेंबर रोजी अपहरण करण्यात आले होते. रंजीत झा यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यांचा मुलगा क्लाससाठी गेला असता तो परत आलाच नाही. या घटनेची माहिती मानपाडा पोलिसांना दिल्यानंतर पोलीसांनी रुद्र झा या मुलाचा शोध घेण्यास सुरुवात केली.

तर दुसरीकडे रणजीत झा यांच्या मोबाईलवर एक फोन आला संबंधित व्यक्तीने सांगितले, तुमच्या मुलगा आमच्या ताब्यात असून मुलाची सुखरूप सुटका करायची असेल तर एक कोटी रुपये द्या. दुसरा दिवशी फोन करणाऱ्या व्यक्तीने दीड कोटीची मागणी केली.

पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या नेतृत्वात पोलिसांचे 20 पथक नेमण्यात आले. ज्या क्लास मधून रुद्र या मुलाचे अपहरण झाले होते ,त्या क्लासच्या आजूबाजूच्या परिसतील पोलिसांनी सीसीटीव्ही चेक केले.

क्लासच्या सीसीटीव्हीमध्ये अपहरण करणाऱ्या आरोपींनी जी गाडी वापरली होती. त्या गाडीच्या नंबर दिसला एवढेच नाही तर आरोपी देखील स्पष्ट दिसले. यानंतर पोलिसांचा तपास सुरू झाला. सीसीटीव्ही आणि मोबाईल लोकेशनच्या आधारावर पोलीस पथक आरोपींच्या शोधात होते.

पालघर जिल्ह्यातील जवळपास 400 स्थानिक लोकांची पोलिसांनी मदत घेतली. तरी पण आरोपी पोलिसांच्या तावडीतून निसटले. यादरम्यान पोलीस आणि आरोपी समोरा समोर आले असता आरोपींनी पोलिसांवर गाडी देखील घातली. यात पोलिसांनी आपला बचाव केला. नंतर पोलिसांना माहिती मिळाली आरोपी दुसऱ्या ठिकाणी पोहोचले आहे. पोलिसांचे 20 पथक ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, नाशिक शहर, नाशिक ग्रामीण, पालघर, बलसाड, आणि सुरत जिल्ह्यात दाखल झाले.

पोलिसांना माहिती मिळाली की आरोपी सुरतला पोहोचले आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांच्या पथक सुरत मधील आरोपींच्या ठिकाणी पोहोचले छापा टाकत रुद्रची सुटका केली आणि अपहरण करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांसह तीन महिला एकूण पाच आरोपींना अटक केली.

डोंबिवलीत खंडणीसाठी 5 मुलांचे अपहरण करून हत्या करण्यात आली आहे. या मुलासोबत असा काही प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांनी सर्वपरीने प्रयत्न केले. अखेर पोलिसांच्या या प्रयत्नाला यश आले.

रुद्रची सुखरूप सुटका झाली आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सुटकेच्या श्वास घेतला झा कुटुंबीयांनी पोलिसांचे आभार मानले. पोलिसांच्या या कौतुकास्पद कामगिरी केल्याबद्दल सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com