Ruby clinic
Ruby clinic

Lokshahi Impact | किडनी तस्करी प्रकरण; रुबी हॉस्पिटलला कारणे दाखवा नोटीस

Published by :

लोकशाही न्यूजने किडनी तस्करीचा (Kidney Racket case) गोरखधंदा चव्हाट्यावर आणला होता. तसेच अशाप्रकारची किडनी तस्करी (Kidney Racket case) करणाऱ्य़ांवर कारवाई करण्याची बातमी प्रसिद्ध करून प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली होती. या बातमीनंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून किडनी तस्करी (Kidney Racket case) प्रकरणी पुण्यातील रुबी हॉस्पिटलला (Ruby Hospital) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आरोग्य विभागाने ही नोटीस बजावली आहे.

लोकशाही न्यूजच्या बातमीनंतर खडबडून जागे झालेल्या पोलीस प्रशासनासह आरोग्य विभागाने दखल घेत रूबी हॉस्पिटलला (Ruby Hospital) नोटीस बजावलीय. रुबी हॉस्पिटल (Ruby Hospital) ससून रोड पुणे या हॉस्पिटल मानवी अवयवचे प्रत्यारोपण अधिनियम नियमन 1994 मधील कलम 16 अंतर्गत रुबी हॉलचे (Ruby Hospital) निलंबन का करण्यात येऊ नये अशा आशयाची नोटीस बजावली आहे. त्यामुळे 24 तासात उत्तर न दिल्यास रुबी हॉस्पिटलवर (Ruby Hospital) गुन्हा दाखल होणार आहे.

कोल्हापूरच्या सारिका सुतार या महिलेला आर्थिक परिस्थिती बिकट आणि कर्जाची परतफेड करण्यासाठी अमित साळुंके आणि त्याची पत्नी सुजाता साळुंके या दोघांनी पिडित महिलेला 15 लाख रुपये देण्याचे कबूल केले होते. मात्र एक रूपयाचीही दमडी न देता सारिका सुतार यांची फसवणूक झाली होती. या घटनेची माहिती मिळताच लोकशाही न्यूजने सर्वप्रथम रुबी हॉस्पिटलमधील (Ruby Hospital) किडनी रॅकेटचा (Kidney Racket case) पर्दाफाश केला होता.या बातमीनंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून पोलीस प्रशासनासह आरोग्य विभागाने बातमीची दखल घेत रूबी हॉल क्लिनिकला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आता 24 तासात उत्तर न दिल्यास रुबी हॉल वर होणार गुन्हा दाखल होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com