…अन्यथा किरीट सोमय्यांना मला १०० कोटी द्यावे लागतील – अनिल परब

…अन्यथा किरीट सोमय्यांना मला १०० कोटी द्यावे लागतील – अनिल परब

Published by :
Published on

निसार शेख | राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांनी लॉकडाउन काळात शेतजमिनीवर रिसॉर्टचं बांधकाम करून फसवणूक केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. या आरोपावर आता अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांना माफी मागावी लागेल किंवा 100 कोटी रुपये द्यावे लावतील," असा इशारा दिला.रत्नागिरी येथे ते बोलत होते.

किरीट सोमय्या मला प्रश्न विचारू शकत नाहीत. ज्या अधिकृत संस्थांनी- यंत्रणांनी मला प्रश्न विचारले आहेत त्यांना मी उत्तरे दिली आहेत. जिल्हाधिकारी, पोलिसांसमोर सर्व कागदपत्रं आहेत. या रिसॉर्टशी माझा संबंध नाही हे मी वारंवार सांगत आहे. पण बदनानी कऱण्यासाठी जाणूनबुजून माझा संबंध जोडत आहेत. शासकीय यंत्रणा याबाबत योग्य ती कारवाई करतील," असं अनिल परब यांनी यावेळी सांगितलं.

"जाणूनबुजून संबंध जोडायचा आणि माझी, महाविकास आघाडी, मुख्यमंत्र्यांची बदनामी करायची हा किरीट सोमय्यांचा धंदा आहे. मी अब्रूनुकसानीचा दावा हायकोर्टात दाखल केला आहे, डिसेंबरमध्ये ही केस येईल. किरीट सोमय्या यांना माफी मागावी लागेल किंवा 100 कोटी रुपये द्यावे लावतील," असा इशारा अनिल परब यांनी यावेळी दिला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com