महाराष्ट्र
मनमाडमध्ये किसान एक्स्प्रेस मालगाडीचा डबा घसरला
संदिप जेजूरकर, मनमाड ( नाशिक ) : किसान एक्स्प्रेस मालगाडीचा डबा रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे. मनमाड रेल्वे स्थानकापासून २ कि.मी.अंतरावरील नगरचौकी येथे ही घटना घडली आहे. या घटनेने मनमाड – पुणे मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.
मनमाड – पुणे रुळावर किसान एक्सप्रेस या मालगाडीचा मनमाड स्थानकानजीक नगरचौकीजवळ डबा घसरला असून त्यामुळे मनमाड – पुणे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे..या घटनेनंतर युद्धपातळीवर रेल्वे अधिकारी व कर्मचारी यांचेकडून डबा हटविण्याचे व दुरुस्तीचे कामे सुरू करण्यात आले आहे..मागील काही दिवसांपूर्वीच मनमाड यार्डमध्ये गाडीची तपासणी करतांना देखील डबे घसरल्याचा प्रकार घडला होता.त्यानंतर आज पुन्हा किसान मालगाडीचा डबा घसरल्याने मनमाड – पुणे रेल्वे मार्गावरील वाहतुकीला काही काळ खोळंबा निर्माण झाला.