Akola : अकोल्यात निवडणूक निकालानंतर वाद; भाजपच्या पराभूत उमेदवाराकडून विजयी उमेदवारावर चाकू हल्ला
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Akola) महापालिका निवडणुकीची काल मतमोजणी पार पडली असून निकाल जाहीर झाले. यावेळी अनेक ठिकाणी गोंधळ, वाद झाल्याचे पाहायला मिळाले. याच पार्श्वभूमीवर अकोल्यात निवडणूक निकालानंतर वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. भाजपच्या पराभूत उमेदवाराकडून विजयी उमेदवारावर चाकू हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली.
अकोल्यात भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकावर भाजपच्याच पराभूत उमेदवार गटाकडून चाकू हल्ला करण्यात आला. भाजप नगरसेवक शरद तुरकर हे सत्कार स्वीकारण्यासाठी एका ठिकाणी जात असताना त्यांच्यावर भाजपचे पराभूत उमेदवार नितीन राऊत यांच्याकडून हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. यावेळी वाहनांची आणि दुकानांची तोडफोड करण्यात आली.
परिस्थिती नियंत्रणात न आल्याने पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आल्याची माहिती आहे. शरद तुरकर हे हल्ल्यात जखमी झाले असून त्यांना अकोल्यातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
Summary
अकोल्यात निवडणूक निकालानंतर राजकीय वाद
भाजपच्या पराभूत उमेदवाराकडून विजयी उमेदवारावर चाकू हल्ला
वाद चिघळल्याने दोन्ही गटाचे लोक आमने सामने
