Shravan Angaraki Sankashta Chaturthi: उद्याची अंगारकी संकष्ट चतुर्थी
Shravan Angaraki Sankashta Chaturthi: उद्याची अंगारकी संकष्ट चतुर्थी; चंद्रोदयाची वेळ व धार्मिक महत्त्व जाणून घ्या...Shravan Angaraki Sankashta Chaturthi: उद्याची अंगारकी संकष्ट चतुर्थी; चंद्रोदयाची वेळ व धार्मिक महत्त्व जाणून घ्या...

Shravan Angaraki Sankashta Chaturthi: अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाची वेळ व धार्मिक महत्त्व जाणून घ्या...

अंगारकी संकष्ट चतुर्थी: श्रावणातील धार्मिक महत्त्व आणि चंद्रोदयाची वेळ जाणून घ्या.
Published by :
Riddhi Vanne
Published on

Shravan Angaraki Sankashta Chaturthi : श्रावण महिन्यातील अंगारकी संकष्ट चतुर्थी यंदा 12 ऑगस्ट 2025 रोजी,म्हणजेच उद्या साजरी केली जाणार आहे. मंगळवारी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हणतात आणि ती वर्षातून दोनदा येते.यावेळी ती श्रावण महिन्यात आल्याने तिचे धार्मिक महत्त्व अधिक वाढले आहे.गणपती बाप्पाची मनोभावे पूजा केल्याने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात, असा श्रद्धावानांचा विश्वास आहे. या दिवशी चंद्राची पूजा करण्याचीही परंपरा असून, चंद्रदर्शनाशिवाय हे व्रत अपूर्ण मानले जाते.

पंचांगानुसार अंगारकी संकष्ट चतुर्थी तिथीचा प्रारंभ 12 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजून 40 मिनिटांनी होईल आणि 13 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजून 36 मिनिटांनी समाप्त होईल. या दिवशी उपवास करून गणेश पूजन केले जाते आणि चंद्रोदय झाल्यानंतर व्रत सोडले जाते. यंदा चंद्रोदय रात्री 9 वाजून 50 मिनिटांनी होणार असून, विविध शहरांमध्ये थोडाफार वेळेचा फरक असेल. मुंबई आणि ठाण्यात रात्री 9.17 वाजता, पुण्यात 9.13, रत्नागिरीत 9.16, कोल्हापूरात 9.12, साताऱ्यात 9.13, नाशिकमध्ये 9.13, अहमदनगरमध्ये 9.09 तर सावंतवाडीत 9.14 वाजता चंद्रोदय दिसणार आहे.

धर्मशास्त्रानुसार चंद्रदर्शन झाल्यानंतर चंद्राला जलअर्पण करून नमस्कार करावा,त्यानंतर गणेशाची आरती करून उपवास सोडावा.श्रावणातील अंगारकी संकष्ट चतुर्थीमुळे मंदिरांमध्ये आणि गणेश मंदिरांमध्ये उद्या भक्तांची मोठी गर्दी अपेक्षित आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com