Kolhapur Ambabai Mandir : अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन 'या' तारखेला बंद राहणार
थोडक्यात
करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मंदिराच्या स्वच्छतेला सुरुवात झाली
अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन 17 तारखेला बंद राहणार
गाभाऱ्याची स्वच्छता केली जाणार असून त्या दिवशी भाविकांना मूळ मूर्तीचे दर्शन मिळणार नाही
(Kolhapur Ambabai Mandir) करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात मोठ्या प्रमाणावर स्वच्छता आणि देखभाल सुरू झाली आहे. अत्याधुनिक साधनांसह 25 कर्मचाऱ्यांची टीम 8 दिवस मंदिर परिसर स्वच्छ करणार असून विशेष म्हणजे 17 सप्टेंबर रोजी देवीच्या गाभाऱ्याची स्वच्छता केली जाणार असून त्या दिवशी भाविकांना मूळ मूर्तीचे दर्शन मिळणार नाही. मुंबईतील आय स्मार्ट फॉसेटिक कंपनीने मोफत सेवा देत मंदिर स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारली आहे.
काल स्वच्छता पथक कोल्हापुरात दाखल झाले. मंदिरातील अधिकारी आणि व्यवस्थापकांच्या उपस्थितीत मशिनरीचे पूजन करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. गाभाऱ्यापासून ते मंदिराच्या परिसरापर्यंत सर्व ठिकाणे व्यवस्थित स्वच्छ करण्यात येणार आहेत.
मागील दीड महिन्यात अंबाबाईच्या चरणी भाविकांनी उदंड दान केले असून तब्बल 1 कोटी 56 लाख 84 हजार 533 रुपयांची भर मंदिराच्या खजिन्यात पडली आहे. मंदिर प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, गाभाऱ्याच्या स्वच्छतेच्या दिवशी दर्शन बंद राहील. भाविकांनी या बदलाची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.