महाराष्ट्र
बैलगाड्या शर्यतीचा बादशहा गेला…!
नंदकिशोर गावडे । बैलगाडी शर्यतीत तुफान वेगाचा बादशहा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गुलब्या बैलाचा आज मृत्यू झाला. या मृत्यूमुळे वर्पे कुटुंबांसह संपूर्ण गाव शोकाकुल झाले होते. यावेळी गावात भजन करत गुलब्याची अंतयात्रा काढण्यात आली.
सुहास वर्पे यांनी गेली 10वर्ष ह्या बैलाला जीवापाड प्रेम केलं.महाराष्ट्र आणि कर्नाटकात होणाऱ्या बैलगाड्या शर्यतीत तुफान वेगाचा बादशहा म्हणून तो ओळखला जायचा. अनेक शर्यती त्याने जिंकल्या आहेत.आज या गुलब्या बैलाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरातील अनेक शर्यत प्रेमींवर शोककळा पसरली होती. दरम्यान डुक्कूरवाडी गावात आज ट्रॅक्टरमध्ये त्याला बसवून फुलांची हारांनी सजविण्यात आले होते. ग्रामस्थांनी भजन करत गुलब्याची अंतयात्रा काढत त्याला अखेरचा निरोप दिला.