Kolhapur : साखरेच्या दरावरून कोल्हापूरात संघर्ष वाढण्याची शक्यता; कोल्हापूरात जिल्हाधिकारी यांनी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ
थोडक्यात
कोल्हापुरात उसाच्या दराबाबत बोलावलेली बैठक निष्फळ
बैठकीतील चर्चेवर आम्ही समाधानी नाही- राजू शेट्टी
'मुख्यमंत्री फडणवीसांना याबाबत आम्ही जाब विचारणार'
(Kolhapur) उसाच्या दराबाबत कोल्हापुरात जिल्हाधिकारी यांनी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ ठरल्याचे पाहायला मिळत आहे. बैठकीतील चर्चेवर आम्ही समाधानी नाही असं राजू शेट्टी यांनी सांगितलं आहे.
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावण्यात आलेल्या पहिल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नसल्याने आंदोलन आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील साखरेच्या दराचा संघर्ष वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आजपासून एक देखील साखर कारखाना चालू करू देणार नाही असा राजू शेट्टी यांनी इशारा दिल्याचे पाहायला मिळत असून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात ऊस दराचा मुद्दा चांगलाच तापला आहे.त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील दराचा संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.
