Kolhapur Panchganga River : कोल्हापूरची पंचगंगा नदी पाचव्यांदा पात्राबाहेर; पाणीपातळी 30 फुटांवर
(Kolhapur Panchganga River) काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती यातच आता पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यभरात पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने विविध जिल्ह्यांत पावसाचा इशारा दिला आहे. राज्यातील बहुतांश भागात पावसाने दमदार हजेरी लावली असल्याचे पाहायला मिळत आहे.
अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे नदी, नाले तुडुंब भरुन वाहत आहेत. पावसाचा जोर आणखी वाढल्याचे पाहायला मिळत आहे. कोल्हापूरची पंचगंगा नदी पाचव्यांदा पात्राबाहेर गेल्याचे पाहायला मिळत आहे. पंचगंगेची पाणीपातळी 30 फुटांवर गेली असून राजारामसह 38 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. राधानगरी धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहे. सातही स्वयंचलित दरवाज्यातून 10 हजार क्युसेक आणि पायथा विद्युतगृहातून 1500 क्युसेक असा एकूण 11500 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.