Kolhapur
Kolhapur

Kolhapur : फुलेवाडी फायर स्टेशन इमारतीचा स्लॅब कोसळून एक ठार, सहा जखमी

अग्निशमन दलाच्या जवानांनी स्लॅबच्या ढिगार्‍याखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढले
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • फुलेवाडी फायर स्टेशन इमारतीचा स्लॅब कोसळला

  • अग्निशमन दलाच्या जवानांनी स्लॅबच्या ढिगार्‍याखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढले

  • या घटनेत एकाचा मृत्यू तर सहाजण जखमी

(Kolhapur) कोल्हापुरातल्या फुलेवाडी येथे फायर स्टेशनच्या इमारतीच्या स्लॅब टाकण्याचे काम सुरू असताना तो कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत एकाचा मृत्यू तर सहाजण जखमी झाले आहेत.

घटनास्थळी जेसीबीसह यंत्रसामग्रीचा वापर करून अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यात आले. जखमींना तात्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी स्लॅबच्या ढिगार्‍याखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढले.

घटनास्थळी तातडीने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.रात्रीच्या वेळी फुलेवाडी फायर स्टेशनच्या नूतन इमारतीचे स्लॅब टाकण्याचे काम सुरू असतानाच हा अपघात घडला असून घटनेची माहिती मिळताच तातडीने बचावकार्य सुरू झाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com